कोव्हीड योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांंसाठी सुप्रीम कोर्टाचे आदेश

Update: 2020-06-17 07:08 GMT

कोरोना विरोधातल्या लढाईत प्रत्यक्ष उतरलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत आणि पगाराबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारांना आदेश द्यावेत असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाईनची सोय नाकारता येणार नाही, असेही कोर्टाने बजावले आहे.

कोव्हीड योद्धे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांना स्वतंत्र आरोग्य सोयी आणि वेळेवर पगार देण्याबाबत दाखल जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

राज्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिले नाहीत तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असे निर्देश केंद्राने राज्यांना द्यावे असेही कोर्टाने सांगितले आहे.

Similar News