हवी मुंबई, पण नकोय तुंबई...

Update: 2019-09-15 13:25 GMT

मुंबई पालिकेने मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील २७०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने ही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मात्र, विकासासाठी वृक्षतोङ करणे हा योग्य मार्ग नाही. आदिवासी बांधवचं यामुळे अस्तित्व संपत आहे. आरे च्या जंगलात २७ अदिवासी पाङे आहेत. यामध्ये आदिवासी बांधवाची शेती सुद्धा आहे. त्यांचं उपजिविकेचं एकमेव साधन शेती आहे.

मुंबई पालिकेच्या विरोधात अनेक पर्यावरणप्रेमी तसंच आदिवासी बांधव सध्या रस्त्यावर उतरत आहेत. या संदर्भात आज वनशक्ती संघटना आणि पर्यावरण तज्ञसमितीच्या सदस्यांचं व्याख्यान आयोजित करण्य़ात आलं होतं. यावेळी मुंबईकरांना ऑक्सिजन पुरवठा करणारी, मुंबईला महापुरापासून वाचवणारी, जमिनीत पाणी धरुन ठेवणारी १०० वर्षे जुनी झाडं तोडू देणार नाही. तुमचे वृक्षारोपण मुंबईला वाचवू शकत नाही. या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणारे आणि 'वनशक्ती संघटना' आणि 'सेव्ह आरे फोरेस्ट'चे प्रमुख संघटक स्टालिन दयानंद यांनी आणि २००५ ला सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या पर्यावरण समितीचे तज्ञ सदस्य डॉ. ए डी सावंत यांनी ही झाडं मुंबईकरांसाठी कशी महत्वाचे या संदर्भात मार्गदर्शन केलं.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2399272453526723/?t=1

 

 

Similar News