अजिंठा लेणीमधील सातकुंड धबधबा कोसळू लागला

Update: 2021-09-07 12:21 GMT


वाघूर नदीचा उगम होत असलेल्या अजिंठा लेण्यांजवळील डोंगर भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे इथला सातकुंड धबधबा कोसळू लागला आहे. दरवर्षी हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमधील वाघूर नदीचा उगम असलेला हा धबधबा ओसंडून वाहत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अजिंठा लेण्यांच्या परिसरात पाऊस सुरु आहे. अजिंठा डोंगर रांगा ह्या U आकाराच्या आहेत. ह्या U आकाराच्या मधोमध ह्याच धबधब्यातून वाघूर नदीचा उगम होतो. वाघूर नदी जळगाव जिल्ह्यातून वाहत जाऊ तापी नदीला जाऊन मिळते. वाघूर नदीवर वाघूर धरण बांधण्यात आले आहे. ह्या धरणातून जळगाव आणि जामनेर शहरला पाणीपुरवठा होतो.

Similar News