थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार, ठाकरे सरकारचा फडणवीसांना मोठा धक्का

Update: 2020-01-22 07:11 GMT

महाविकास आघाडीचं सरकार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेला आणखी एक निर्णय रद्द करण्याच्या तयारीत आहे. फडणवीस सरकारने 2016 ला नगराध्यक्ष आणि सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, ठाकरे (Thackeray) सरकार आता सरपंचाची थेट जनतेतून होणारी निवडणूक करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी प्रतिक्रिया देताना

"राज्यात मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंचाची निवड झाली होती. पण यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ठरवलं आहे की सरपंचाची सदस्यांमधून निवड व्हावी, थेट निवड होणार नाही यासाठी आम्ही लवकरात लवकर मंत्रीमंडळासमोर अध्यादेश आणणार आहोत.

कारण एकाच विचारधारेचा सरपंच निवडून येतो आणि सदस्यांची विचारधारा वेगळी असते. त्यामुळे विकासकामांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात," असं म्हणत आगामी काळात थेट जनतेतून होणारी सरपंचाची निवडणूक रद्द केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

हे ही वाचा...

संविधानाचा प्रसार आणि पर्यावरण रक्षणाचा निर्धार

काश्मीर मुद्द्यावर मदत करण्यास तयार : डोनाल्ड ट्रम्प

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याच्या सूत्रधाराला शिक्षा कधी?

 

Similar News