सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम

Update: 2021-02-24 11:30 GMT

गुजरातमधील अहमदाबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून आता नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या बुधवारी सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचे भूमिपूजन केले. याच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा नरेंद्र मोदी स्टेडियम हे हिस्सा असणार आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नमस्ते ट्रम्प यांचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी याच मोटेरा स्टेडियमवर झाला होता. सध्या याच स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड दरम्यान पहिली डे-नाईट टेस्ट सुरू आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचे भूमिपूजन करण्यात आले. याच स्पोर्ट्स कॉम्प्लेकमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम असणार आहे. हे जगातील सगळ्यात मोठे क्रिकेट स्टेडियंम असेल. याची प्रेक्षक क्षमता १ लाख ३२ हजार असणार आहे. है मैदान अंडाकृती आहे. त्यामुळे यावरील ११ पिचपैकी कुठेही मॅच झाली तर सीमारेषा सारख्या अंतरावर आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फूटबॉल, हॉकी यासह विविध खेळसुद्धा खेळता येणार आहेत.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम हे सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जायचे. पण आता या स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. तर इतर खेळांसह होणाऱ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्यात येणार आहे.सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम

Tags:    

Similar News