राज्यसभेत संजय राऊतांचा ईव्हीएमबाबत प्रश्न

Update: 2019-06-27 09:23 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम मशिनसंदर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मतदार आणि मिळालेल्या एकूण मतदानाची संख्या यात फरक आहेत. महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मतदान तफावतींच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचे काय होते, याबाबत कारवाई होणार का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यावर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर दिले.

व्हीव्हीपॅटसंदर्भात अशी कुठलिही तक्रार आली नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच, मतदान प्रक्रियेवेळी निवडणूक आयोगाचे अधिकारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनीधीही हजर असतात. त्यामुळे, तशी कुठलिही तक्रार नसून संबंधित प्रकाराबाबत विशेष स्पेसिफीक तक्रार आल्यास नक्कीच याबाबत माहिती घेऊन मी प्रश्नकर्त्यांच्या उत्तराचे समाधान करेल, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

Similar News