Sanjay Raut : गुंडांच्या सरदारांना आम्ही ५ वर्ष नाही, २५ वर्ष घरी बसवू

Update: 2020-11-13 11:45 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन व्यवहाराबाबत आरोप केले होते.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या नावावरचे २१ सातबारा उताऱ्याचा दाखला देत नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये जमिनींचे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या व्यवहारा मागचा अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठाकरे आणि वायकर जमिनींचे व्यवहार का करत आहेत? महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हे समजावून सांगणार का?, असे सवाल किरीट सोमय्यांनी केला होता.

यावर संजय राऊत यांनी किरिट सोमय्यासह केंद्रीय नेतृत्वावर टीका केली आहे. "भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जमिनीच्या व्यवहारावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत, ते सर्व खोटे आहेत. त्यांनी ईडीच्या चौकशीची मागणी केली आहे, त्या ईडीचे मालक दिल्लीत बसलेत. ते व्यापारीच आहेत. मात्र, या व्यापारांना त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही ५ वर्ष नाही, २५ वर्ष घरी बसवू," अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

जर एखादा व्यवहार केला असेल तर त्यात गैर काय आहे? भ्रष्टाचार असे बोंबलत आहेत. ते रोज सकाळी आरशात स्वत:चा चेहरा पाहतात. त्यांना स्वत:कडे पाहून भ्रष्टाचार झाला असं वाटतं," असा टोलाही राऊत यांनी सोमय्या यांचं नाव न घेता लगावला आहे. मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं त्याबाबत बोलत नाहीत. मात्र गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जातात. अर्णव यांचा कोण लागतो?", असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना विचारला.

"आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्याची आहे. मात्र, शेठजींच्या पक्षातील काही प्रवक्ते आहेत, त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. म्हणून ते अशी नाटकं करत आहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही," असा टोला संजय राऊतांनी लगावला.



Full View
Tags:    

Similar News