संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह...

Update: 2021-02-25 13:16 GMT

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणानंतर नॉटरीचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड हे 23 तारखेला मोठे शक्ती प्रदर्शन करत पोहरादेवी येथे दाखल झाले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, तरीही बंजारा बांधव हजारोंच्या संख्येने संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले.

या सर्व घडामोडींमध्ये 22 फेब्रुवारीला 30 नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महंत कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील 4 जनासह आज 8 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आज महंत कबिरदास महाराज यांचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे वनमंत्री संजय राठोड यांनी कबिरदास महाराज यांच दर्शन घेतले होते. त्यांनाही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.

पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून,गावात कोरोना टेस्ट सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर यांनी दिलीय.

Tags:    

Similar News