सांगली: एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Update: 2021-11-11 10:51 GMT

सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील एसटीचे कंडक्टर राजेंद्र एन. पाटील (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सांगली एसटी आगारात पाटील हे कार्यरत होते. सध्या एसटीचा संप असल्याने ते घरीच होते. घरीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

राजेंद्र पाटील हे एसटीत वाहक म्हणून कार्यरत होते. गेले काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. सध्या संपामुळे चाके थांबली आहेत. त्यातच सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी चिंतेत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र पाटील हेही तणावात होते.

संपाबाबत त्यांनी सहकाऱ्यांशी बोलताना चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी आयोग निर्माण करा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तोच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा. अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, सरकारने यासाठी तीन आठवड्याचा कालावधी मागितला आहे. आजपर्यंत 37 आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळं सरकारने तात्काळ यावर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

Tags:    

Similar News