मराठा आरक्षण: मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांची भेट संपली, काय घडलं भेटीत?

Update: 2021-06-17 16:49 GMT

आज खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्यासह राज्यातील मराठा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत खासदार संभाजीराजे(MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या मान्य झाल्या नाही तर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे खासदार संभाजी राजे यांनी कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाजवळ 16 जूनला मूक आंदोलन केले होते.

त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना भेटीसाठी बोलावलं होतं. या भेटीनंतर आज संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मूक आंदोलन सुरुच राहणार असल्याचं यावेळी संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूरला झालेल्या पहिल्या मूक आंदोलनानंतर आता ३६ जिल्ह्यांत मूक आंदोलन करण्याचा मानस असल्याचं संभाजीराजे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. सरकारने आज कोल्हापूरमधील आंदोलनाची ताबडतोब दखल घेतली. त्यामुळे आम्ही बैठकीसाठी इथे आलो. २१ जून रोजी नाशिकमध्ये मूक आंदोलन नियोजित आहे. पण तिथे राज्यातील सर्व समन्वयक आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Cm Uddhav Thackrey On Maratha Reservation), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यानं संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात कोल्हापूर येथे 'मूक आंदोलन' केलं जाणार आहे.

या आंदोलनात वंचित बहुजून आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते.

काय आहेत खासदार संभाजी राजे यांनी केलेल्या मागण्या? (MP Sambhaji Raje Chhatrapati on Maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (SC On Maratha reservation) रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे केंद्र आणि राज्यसरकारवर अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत काही मागण्या केल्या आहेत. त्यातील

1) रिव्ह्यू पिटीशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका तर ती फुलप्रुफ दाखल करा...

2) क्युरिटीव्ह पिटीशन

3) घटना कलम 342-A नुसार राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव सादर करून तो पुढे राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेकडे सादर केला जाईल आणि त्यातून आरक्षण मिळणं सोप्प होईल.

या तीन मागण्या केल्या आहेत.

खासदार संभाजीराजे यांनी राज्याचा दौरा करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधत या सूचनांची अंमलबजावणी सरकारने केली नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता.

Full View

Tags:    

Similar News