'मोहन भागवतजी तुमचा शब्द काळ्या दगडावरील पांढरी रेष नाही' - खरात

Update: 2021-09-07 07:58 GMT

ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशन' ने आयोजित केलेल्या 'राष्ट्र सर्वप्रथम राष्ट्र सर्वोतोपरी' या व्याख्यानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, 'आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत. आमच्या दृष्टीने हिंदू हा मातृभूमी, पूर्वज, तसेच भारतीय संस्कृतीचा वारसा याचा प्रतिशब्द आहे. हिंदू हे कुठलेही जातिवाचक अथवा भाषावाचक नाम नसून, जगातील प्रत्येक व्यक्तीचा विकास, उत्थान आणि मार्गदर्शन करणाऱ्या परंपरेचे नाव आहे', असे प्रतिपादन केले होते.

सोबतच 'हिंदू धर्माची ही व्याख्या ज्या कुठल्या पंथातील, धर्मातील, भाषेतील नागरिक मानतात, त्या सगळ्यांना आम्ही हिंदू मानतो. दुसऱ्यांच्या मतांचा इथे अनादर होणार नाही. मात्र मुस्लिम वर्चस्वाचा नाही, तर भारताच्या वर्चस्वाचाच विचार करणे महत्त्वाचे आहे.' असेही भागवत म्हणाले.

दरम्यान मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात सिदनाक यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'मोहन भागवतजी तुमचा शब्द काळ्या दगडावरील पांढरी रेष नाही. भारतीय संविधानाप्रमाणे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, फारशी हे फक्त भारतीय आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मी पूर्वी भारतीय होतो आजही भारतीय आहे यानंतरही माझी ओळख फक्त भारतीयच राहणार आहे. हे समजायला तुम्हाला संविधान वाचायला लागेल.' अशी प्रतिक्रिया खरात यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News