Ayodhya Hearing : मोहन भागवत दिल्लीकडे रवाना, दुपारी 1 वाजता साधणार माध्यमांशी संवाद

Update: 2019-11-09 04:59 GMT

आज राम जन्मभूमी खटल्याचा निकाल लागणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे घटनापीठ करत आहे. या घटनापीठात न्यायमुर्ती शरद अरविंद बोबडे, न्यायमुर्ती अशोक भूषण, न्यायमुर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती एस. अब्दुल नजीर यांचा या खंडपीठात समावेश आहे.

या खटल्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. अलाहाबाद न्यायालया ने 30 सप्टेंबर 2010 ला दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आज या संवेदनशील तसंच धार्मिक बाबीशी निगडित असलेल्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

दरम्यान या सर्व न्यायालयीन खटल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्वाची असणार आहे. त्यामुळं सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीकडे रवाना झाले असून दुपारी एक वाजता ते निकालावर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Similar News