गणपतराव देशमुखांच्या मतदार संघात युतीचा ‘हा’ उमेदवार मैदानात?

Update: 2019-09-19 08:17 GMT

महाराष्ट्रात तब्बल बारा वेळा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे यंदा शेकाप कोणाला उमेदवारी देणार त्याच बरोबर विरोधी पक्षातून कोण मैदानात उतरणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान एकीकडे आ. गणपतराव देशमुखांनी निवडणूक लढावी म्हणून शेकाप कार्यकर्त्यांनी आता प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे धनगर समाजातील रासप चे प्रवक्ते, माणदेशी ऊसतोड कामगार, संघटनेचे अध्यक्ष प्रा लक्ष्मण हाके यांना सांगोल्यातून रासप उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप शिवसेनेची युती न झाल्यास मित्र पक्षांना अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून परिचित असलेल्या प्रा. लक्ष्मण हाके यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर गणपतराव देशमुखांनी उमेदवारी नाकारली तर शेकापचा उमेदवार आणि युतीच्या उमेदवारात लढत होईल. यात कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान या संदर्भात प्रा. लक्ष्मण हाके यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण स्विकारु. असं म्हणत उमेदवारी बाबत थेट भाष्य करण्याचे टाळले आहे.

Similar News