पदोन्नती आरक्षण: अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर 353 चा गुन्हा दाखल

Update: 2021-05-11 14:54 GMT

पदोन्नतीमधील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर मागासवर्गीय समाजामध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. हे आरक्षण रद्द झाल्यानंतर आझाद समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या घरासमोर 10 मेला निदर्शनं केली होती. शासनाने काढलेल्या आरक्षण रद्दच्या जी आर ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर होळी करत घोषणाबाजी केली.

त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना डी एस पी यांनी स्वतः येऊन अटक केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून या कार्यकर्त्यांच्या विरोधात 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदोन्नतील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याच्या समितीच्या अध्यक्ष पदी उपमुख्यमंत्री अजित पवार असून त्यांनी हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मराठा समाजाला खुश करण्यासाठी घेतल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी मागासवर्गीयांचा बळी दिल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.

दरम्यान या कार्यकर्त्यांच्या वकिलांनी कार्यकर्त्यांवर 353 गुन्हा यामध्ये बसत नसताना देखील त्यांच्यावरती 353 गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच सोबत एपीडिमिक ऍक्ट, नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऍक्ट व इतर ऍक्ट लावून 5 दिवसांच्या पोलीस कस्टडीसाठी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. परंतु न्यायालयाने 1 दिवसाची कस्टडी देत दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. Adv .तोहशिफ शेख यांनी असे मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

Full View
Tags:    

Similar News