पुरुषांचं #metoo ...तर माझाही 'धनंजय-मुंडे' झाला असता:मनीष धुरी

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांना आता वेगळेच वळण लागले आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी माध्यमांच्या समोर येऊन धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक आरोप करणाऱ्या रेणू शर्मा विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी पुढे येऊन माझाही धनंजय मुंडे झाला असता असा खळबळजनक दावा केला आहे.

Update: 2021-01-14 14:45 GMT

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर एकच खळबळ माजली. दरम्यान, आता या प्रकरणाला हनी ट्रॅपचं वळण लागताना दिसत आहे. कारण भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी गुरुवारी माध्यमांच्या समोर येऊन धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक आरोप करणाऱ्या रेणू शर्मा विरोधात तक्रार दाखल केली आहे.

रेणू शर्मा ही महिला २०१० ते २०१५ या काळात छळ करत होती, ब्लॅकमेल करत होती, असा आरोप हेगडे यांनी केले आहेत. दरम्यान, कृष्णा हेगडे यांनी पुढे येऊन रेणू शर्मा प्रकरण सांगितल्या नंतर काही वेळातच मनसे नेते मनीष धुरी यांनी पुढे येऊन मोठा खुलासा केला आहे. माझाही धनंजय मुंडे झाला असता असा खळबळजनका दावा मनीष धुरी यांनी केला आहे.

भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसे नेते मनीष धुरी यांनाही रेणू शर्माने ब्लॅकमेल केल्याचं म्हटलं. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. "माझा २००८-०९ सालात माझाही धनंजय मुंडे झाला असता जर मी सतर्क झालो नसतो. रेणू शर्मा नावाची महिलेने माझे नंबर कुठून तरी मिळवले. त्यानंतर माझा ती पाठलाग करु लागली.

त्यावेळी मी मनसेचा विभाग अध्यक्ष होतो. तेव्हा मला एवढं काही समजलं नाही. लोकं आम्हाला फोन करत होती. तसंच मलाही वाटलं. परंतू तिने खूप काही चुकीचं करायचे प्रयत्न केले. माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती. मला ब्लॅकमेल खूप करायची. तिला व्हिडिओ अल्बम करायचा होता. त्या अनषंगाने ती आणि तिची बहिण मोठमोठ्या लोकांना हेरायची. हे मला समजलं. त्यानंतर कसातरी तिच्यापासून पिच्छा सोडवला," असं मनीष धुरी यांनी सांगितलं.

Full View


Tags:    

Similar News