केंद्र सरकारला उशिरा जाग, रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करणार…

Update: 2021-04-15 03:35 GMT

देशात कोरोनाचे आकडे वाढत असताना कोरोनाच्या विरोधात प्रभावी औषध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेमडेसिवीरची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यातच रेमडेसिवीरची काळा बाजार होत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असल्यानं महाराष्ट्रात मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या उत्पादनात वाढ केली नव्हती. आता सरकारने या उत्पादनात वाढ केली आहे.

११ एप्रिलला रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. आता हा तुटवडा आणि काळाबाजार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आज १४ एप्रिलला रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दुप्पट उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. सध्या 39 लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचं प्रॉडक्शन केलं जात होतं. आता ही क्षमता ७८ लाख केली आहे.महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हे इंजेक्शन प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर च्या अधिकारात दिलं आहे.

Tags:    

Similar News