राशन गायब आणि मोफत राशन चा बाईट पण गायब....

Update: 2022-01-02 12:44 GMT

आगामी उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपनेत्यांची दिग्गज फौज मैदानात उतरली आहे. जनमत प्रभावीत करण्यासाठी प्रमुख भाजपनेत्यांच्या सोशल मिडीया खात्यामधून व्हिडीओ प्रसारीत केले जात आहे. आता भाजपनेते संबीत पात्रा Sambit Patra यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडीओमधे एक लाभार्थी भावूक होऊन मोफत रेशन मिळाल्याचे सांगत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानत आहे. या व्हिडीओचे ट्विट हजारो भाजप नेत्यांनी रिट्वीट करुन लाईक केले आहे.

पूरा वीडियो क्यों नही दिखाया @sambitswaraj असं सांगत Mohammed Zubair यांनी त्याच व्हिडीओचा दुसरा भाग उत्तरात पोस्ट केला आहे.

त्यामधे त्याच लाभार्थ्यांच्या व्हिडीओमधील दुसरा भाग असून त्यामधे तो मोफत रेशनकार्ड अद्याप मिळाले नसल्याचे सांगतो.

लाभार्थी कार्डातून त्याचे युनिट कमी करुन पुरवठा अधिका-यांनी हा घोटाळा केल्याचे सांगत आहे. मी मोदींचा फॅन नसून देशाचा फॅन असल्याचे तो सांगतो. या व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

Tags:    

Similar News