राणा दाम्प्त्याच्या अडचणीत वाढ

Update: 2022-04-29 07:09 GMT

हनुमानचालिसा पठनावरुन राणा दाम्प्त्य चांगलचं अडचणीत सापडलं आहे.या दोघांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.मात्र सरकारने त्यांच्या जामीनाला जोरदार विरोध केला.त्यासाठी सरकारकडून(Navneet rana) राणा दाम्प्त्याची कुंडलीच बाहेर काढली आहे.दोघांवर ठिकठिकाणी एकूण २१ गुन्हे दाखल केले असून त्यातील काही गंभीर स्वरुपाचे आहेत.

राणा(Ravi Rana) दाम्प्त्याच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली.सरकारच्या वतीने अॅड. प्रदिप घरत यांनी न्यायालयात लेखी स्वरुपात सरकारची बाजू सादर केली.तर राणांच्या वतीने त्यांच्या वकीलांनीही जामीनाची मागणी करत बेकायदेशीरपणे त्यांना अटक केल्याचे सांगितले.पण न्यायालयाने आता यावर शनिवारीही सुनावणी ठेवली आहे.त्यामुळे राणांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Cm uddhav Thackrey) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. पण यादरम्यान शिवसैनिकांच्या राणांच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, अशी गंभीर तक्रार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. या आरोपांबाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडून पोलीस ठाण्यातील चहा पितानाचा व्हिडीओ, राणांच्या वकिलांनी नंतर केलेला खुलासा अन् आता राणांनीच न्यायालयात दिलेली माहिती यावरून आता या प्रकरणात पारडं कोणाच्या बाजूने जड होणार हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.

Tags:    

Similar News