रमेश कदम यांना हायकोर्टाकडून तात्पुरता जामीन, अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता

Update: 2019-10-01 11:57 GMT

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. यानंतर आता कदम हे मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात २०१५ पासून ते अटकेत आहेत.

रमेश कदम यांना ईडी कोर्टाकडून याआधीच जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र सीआयडीने दाखल केलेलं प्रकरण प्रलंबित असल्याने कदम जेलमध्येच होते. त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती आणि आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय.

महामंडळाचे अध्यक्ष असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं गेलं होतं. यामुळे कदम अपक्ष म्हणून लढणार असल्याचं कळतंय.

Similar News