रामदास आठवले आज होणार डॉक्टर!

Update: 2020-02-13 09:01 GMT

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा डि.लीट पदवीने डी वाय पाटील विद्यापीठातर्फे गौरव करण्यात येणार आहे. हा पदवीदान सोहळा नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

त्याबाबत चे अधिकृत निमंत्रण डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विजय पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पाठवले आहे.

डी वाय पाटील विद्यापीठाच्या 14 व्या वार्षिक पदवीदान सोहळ्यात रामदास आठवले यांना सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास निमंत्रित करण्यात आले आहे.

या समारंभात रामदास आठवले यांना डी वाय पाटील विद्यापीठातर्फे डी.लीट ही मानाची पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.

Similar News