'पंकजाताईला जे जमलं ते मला जमलं नाही'; आणखी एका भाजप नेत्याची जाहीर नाराजी

Update: 2020-05-13 13:31 GMT

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यावरून भाजपमधले अनेक जुने नेते नाराज आहेत. त्यात आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे.

माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. असं करतांना त्यांनी पक्षासोबतच पंकजा मुंडे यांनाही टोला लगावला आहे.

'विधान परिषदेच्या निमित्ताने पक्षातील इच्छुक नेते समजून घेतील आणि शिकतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पंकजा मुंडे यांनी दोनच दिवसांत चांगला अभ्यास केला आणि रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. असं मला आणि पक्षाच्या इतर नेत्यांना जमलं नाही', असं राम शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Similar News