राजीव सातव रुग्णालयात, राहुल गांधींचा डॉक्टरांना फोन

Update: 2021-04-29 06:20 GMT

काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांना 22 एप्रिलला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, त्यानंतर आता त्यांची प्रकृती खालावली आहे. सातव यांची प्रकृती खालावल्याचं समजताच राहुल गांधी यांनी तात्काळ डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली.

२२ एप्रिलला सातव यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती.

"सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी केली असता आपला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियमांचं पालन करावं," असं

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. दरम्यान आज सकाळी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील एक टीम त्यांच्या उपचारासाठी थेट पुण्याला जाणार असल्याचं समजतंय. राजीव सातव हे गुजरातचे प्रभारी असून राहुल गांधींच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीपैकी एक आहेत.

Tags:    

Similar News