भाजपानं संविधानाची सर्कस केली: रणदीप सुरजेवाला

Update: 2020-07-24 11:39 GMT

राजस्थान मध्ये निर्माण झालेला सत्ता संघर्ष अद्यापपर्यंत थांबण्याचं नाव घेत नाही. कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांचे राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी मतभेद झाल्यानं ते नाराज आहेत. त्यांचा पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी पक्षात केलेल्या बंड फसलं असल्याचं बोललं जात असलं तरी सध्या सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. सचिन पायलट यांना राजस्थान च्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढण्यात आलं आहे. तसंच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटवण्यात आलं आहे.

हे सर्व घडत असताना सचिन पायलट यांचं बंड फसल्याचं सांगितलं जात असलं तरी राजस्थान मधील सत्ता संघर्ष अद्यापपर्यंत थांबलेला नाही. काँग्रेसचे नेते रणदीप सिग सुरजेवाला यांनी या सत्ता संघर्षावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये “भाजपानं संविधानाची सर्कस केली आहे. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांचं जे झालं होतं तेच राजस्थानची कृष्णरूपी जनता भाजपाच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल.’’

असं पहिल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्विट मध्ये

जेव्हा काँग्रेसकडे बहुमत आहे, सभागृहदेखील भरवायचं आहे, तसंच हा अधिकार सरकारचा आहे. तेव्हा भाजपावाले आणि त्यांचे अनुयायी का पाठ दाखवून पळून जात आहे. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.

Similar News