सचिन पायलट यांच्यावरच उलटला डाव, काँग्रेसची मोठी कारवाई

Update: 2020-07-14 08:48 GMT

राजस्थानमध्ये आपल्याच सरकारविरुद्ध बंड करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर अखेर काँग्रेसने कारवाई केली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिलीये. पायलट यांच्यासह विश्वेद्र सिंह आणि रमेश मीना यांनाही त्यांच्या मंत्रीपदावरुन हटवत असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे.

पायलट यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी आता गोविंद दोतास्त्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपशी संगनमत करुन सचिन पायलट आणि इतर काही मंत्र्यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना एका रिसॉर्टवर ठेवले असून या आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केल्याचीही चर्चा आहे.

राजस्थानातील पक्षीय बलाबल

एकूण जागा 200

काँग्रेस – 107

भाजप- 72

अपक्ष – 13

इतर – 8

Similar News