राज्यस्थान मध्यप्रदेशाच्या वाटेवर, राहुल गांधी कुठे आहेत?

Update: 2020-07-12 13:04 GMT

राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालं आहे. कॉंग्रेस नेते सचिन पायलट नाराज असून त्यांच्यासोबत साधारण 12 ते 15 आमदार त्यांच्यासोबत असल्याचं विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद आहे.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी आपले आमदार घेऊन भाजपच्या वाटेवर जाण्याची तयारी केली असल्याचं समजतंय. त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे 22 आमदार भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या हातून राजस्थान सारखं राज्य देखील जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यंतरी मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कमलनाथ सरकार मधील कॉंग्रेसच्या आमदारांना सोबत घेऊन भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांचं सरकार आलं होते.

मात्र, ज्या राज्यात जनतेला कॉंग्रेस ने भरभरुन मतदान केलं. त्या राज्यातील सरकार अशा प्रकारे नेत्यांच्या आपआपसातील वादामुळं जात असेल तर पक्षाच्या अध्यक्ष आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वानं याचा विचार करणं गरजेचं आहे.

कॉंग्रेस नेतृत्वाने अद्यापपर्यंत सचिन पायलटची भेट घेतली नसल्याचं समजतंय.

Similar News