राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट…

Update: 2019-11-02 16:45 GMT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूकीच्या काळात जोरदार प्रचार केला. मात्र, मनसे ला (MNS) विधानसभा निवडणूकीत सूर गवसला नाही. यानंतर आज राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली.

राज्यात राष्ट्रपती शासन कसे लागू केले जाते?

कॉग्रेस राष्ट्रवादीला राष्ट्रपती राजवटीची भीती वाटते का?

'राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का?' सामनाच्या अग्रलेखातून मुनगंटीवारांवर टीकास्त्र

मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला. त्यानंतर राज्यात आता सत्ता स्थापनेबाबत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मेळ बसत नसताना राज आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दोनही नेत्यांमध्ये जवळ जवळ 20 मिनिटं चर्चा झाली.

मात्र, या भेटीत कशा संदर्भात चर्चा झाली हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही. दरम्यान राज्यातील सत्ता स्थापने संदर्भात शरद पवार उद्या कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

Similar News