राज ठाकरेंनी दाखवला समजूतदारपणा, अजान संपल्यावर पोहोचले आरतीला

Update: 2022-04-16 14:24 GMT

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर अनेक ठिकाणी मनसेच्या भूमिकेवर टीका होते आहे. यामुळे राज्यात तणाव निर्माण होऊ शकतो अशी भीतीही सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात आरती केली. आरतीची वेळ संध्याकाळी साडे ते सात वाजताची होती...याचवेळेत अजानहीची वेळ असते. त्यामुले अजानच्या वेळीच आरती होणार असा अंदाज होता. पण राज ठाकरे यांनी समजूतदारपणा दाखवला आणि आरतीच्या ठिकाणी ते ७.१५च्या सुमारास पोहोचले. त्यामुळे अजानची वेळ टळून गेली. तिथे असलेली गर्दी पाहता अजान आणि आरती एकाचवेळी झाली असती तर तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. पण राज ठाकरे यांनी तसे होऊ दिले नाही.

राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील भाषणात ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. तसेच रमजान महिन्यात लाऊड स्पीकर लावले तर समजू शकतो, ३६५ दिवस नको, अशीही भूमिका मांडली होती. त्यामुळे या भूमिकेला अनुसरुन राज ठाकरे यांनी अजानची वेळ टाळून आरतीला पोहोचण्याचा समजूतदारपणा दाखवल्याचे सांगितले जाते आहे.

Full View

Similar News