रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी आणखी एक पाऊल

Update: 2020-05-22 02:43 GMT

24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. पण त्यानंतर देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या. त्यानंतर सरकारने इतर अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आता रेल्वेने आपली सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आजपासून देशातील तिकीट बुकींग काऊंटर सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेच्या सर्व झोनना बुकींग काऊंटर सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये त्या त्या झोनमधील लोकांच्या सोयीने टप्प्या टप्प्याने बुकींग काऊंटर सुरू करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या बुकींग काऊंटरची वेळ त्या त्या झोनने लोकांच्या सोयीने ठरवावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेने सामान्य सेवा केंद्रांमधून आणि एजन्टमार्फत बुकींगलाही आता परवानगी दिली आहे. पण ही रेल्वे सेवा सुरू झाली तरी श्रमिक ट्रेन सुद्धा सुरूच राहणार असल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेसेवा पूर्ववत केली जात असली तरी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम बंधकारक असतील असेही रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

Similar News