माजी लष्करप्रमुखांची भेट घेतल्यानंतर राहुल म्हणाले '' काळजी केवळ सीमांचीच नाही तर...''

Update: 2023-01-09 07:25 GMT

हरियाणात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कुरुक्षेत्रच्या खानपूर कोलियापासून आज सुरुवात झाली आहे. काँग्रेसने या दिवशी महिलांना ही यात्रा समर्पित केली आहे. ज्यात या यात्रेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दिल्ली-चंदीगड महामार्गावरील त्योडातील सरदार जी ढाब्यावर ही यात्रा सध्या टी-ब्रेकसाठी थांबली होती. येथे राहुल गांधी चहा-नाश्ता घेऊन महिलांशी चर्चा देखील केले. काल रात्री उशिरा कुरुक्षेत्रात राहुल गांधींनी ब्रह्मसरोवरची यात्रा आणि महाआरतीही केली.

काल माजी लष्करप्रमुखांची भेट घेतल्यानंतर राहुल म्हणाले... भारतीय सैन्य हे देशाचा अभिमान आहे, जे प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. जेव्हा भारताच्या सीमांच्या सुरक्षेचा विचार केला जातो तेव्हा त्यांचे मत सर्वात महत्त्वाचे असते. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव आणि प्रशिक्षण त्यांना सर्वोत्कृष्ट बनवते. आजची परिस्थिती पाहून त्यांना केवळ सीमांचीच नाही, तर देशाच्या अंतर्गत परिस्थितीचीही काळजी वाटते. भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन त्यांना हा संदेश द्यायचा आहे की आपल्या एकतेचा पाया मजबूत असेल तर देश मजबूत होईल.

लेफ्टनंट जनरल आर के हुडा, लेफ्टनंट जनरल व्ही के नरुला, एअर मार्शल पी एस भांगू, मेजर जनरल सतबीर सिंग चौधरी, मेजर जनरल सतबीर सिंग चौधरी यांच्यासह भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला राहुल गांधी भेटले. जनरल धर्मेंद्र सिंग, कर्नल जितेंद्र गिल, कर्नल पुष्पेंद्र सिंग, लेफ्टनंट जनरल डी डी एस संधू, मेजर जनरल बिशंबर दयाल आणि कर्नल रोहित चौधरी तसेच निमलष्करी दलाचे माजी अधिकारी एच आर सिंग, सुरेश कुमार, रणबीर सिंग, व्ही एस कदम आणि काली राम यांना भेटण्याची संधी मिळाली.

Tags:    

Similar News