केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक, देशव्यापी आंदोलनाची हाक

Update: 2020-06-25 02:22 GMT

देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती, चीनबरोबरचा वाद आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर या तीन मुद्द्यांवर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्व राज्य प्रमुखांची बुधवारी बैठक घेऊन आता देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

चीनच्या सीमेवर शहीद झालेल्या 20 जवानांना आदरांजली म्हणून 26 जूनला देशभर 'शहिदांना सलाम' ही मोहीम राबवण्याचे आदेश राहुल गांधींनी दिलेले आहेत. त्याचबरोबर 29 जून रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात येतील असे देखील राहुल गांधींनी सांगितलेले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील 26 जून रोजी सलाम शहिदांना या मोहिमेमध्ये दिल्लीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा..

अखेर अजोय मेहता यांना मुख्य सचिव पदावरुन हटवले, ‘हे’ असणार नवे मुख्य सचिव…

Modi vs Manmohan मोदींच परराष्ट्र धोरण आत्तापर्यंतच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणापेक्षा श्रेष्ठ आहे का?

हाताला काम हवं आहे का? मग ही लिंक क्लिक कराच

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. कोरोनाबाबत आपण सरकारला आधीच इशारा दिला होता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतेही संकट गांभीर्याने घेत नसल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केलेला आहे. आता काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सरकारचे हेच अपयश जनतेसमोर आणण्याची वेळ आहे असं सांगून राहुल गांधी यांनी या देशव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे.

Similar News