राहुल गांधी आज ठोकणार शड्डू, आजही यात्रेला २ तास उशिरा सुरवात...

Update: 2023-01-07 07:11 GMT

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शनिवारी म्हणजेच आज कर्नालमध्ये पोहोचली आहे. कोहंड येथून हा प्रवास सुरू होईल. राहुल गांधी कर्नालमध्ये 24 किमी चालणार आहेत. यादरम्यान ते आज एका कबड्डी सामन्यातही सहभागी होणार आहेत.

काल राहुल गांधी यांनी यंत्राला २ तास उशिरा सुरवात केली होती तर आजही यात्रा २ तास उशीर सुरु होणार आहे. याआधी राहुल गांधी सकाळी सहा वाजता यात्रेला सुरुवात करायचे, मात्र अजूनही कर्नालमध्ये यात्रा सुरू झालेली नाही. वास्तविक राहुल गांधी काल रात्री दिल्लीत परतले होते. त्यामुळे कर्नालमध्ये सकाळी ८ वाजता यात्रेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

याआधी शुक्रवारी राहुल गांधींनी पानिपतमध्ये 13 किलोमीटरची पदयात्रा केली. यानंतर हुड्डा मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले. काळ सभा संपल्या नंतर राहुल गांधी पुन्हा दिल्लीत परतले होते. राहुल गांधी शुक्रवारी रात्री बाबरपूर मंडी येथे मुक्काम करणार होते. हुड्डा मैदानावरील रॅलीनंतर चौपरहून ते दिल्लीला परतले. त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ते दिल्लीला गेले होतो.. गुरुवारी रात्रीही ते सनौली खुर्द येथे थांबले नाहीत. उत्तर प्रदेशातून यात्रेत दाखल झाल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले होते. मात्र, ते यात्रेत सहभागी होण्यासाठी शनिवारी सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा २ तास उशिरा परतणार असून यात्रा २ तास उशिरा सुरु होणार आहे..

हरियाणा आणि पंजाब यांच्यात मैत्रीपूर्ण कबड्डी सामना...

हरियाणा काँग्रेसचे सचिव रघबीर संधू यांनी सांगितले की, राहुल गांधी सकाळी 10.30 वाजता कुटेल फ्लायओव्हरसमोरील सीएनजी पंपाच्या मागे दुपारचे जेवण घेतील. जिथे राहुल गांधी दुपारी २.१५ पर्यंत कार्यकर्त्यांमध्ये थांबतील. त्यानंतर कंबोपुराजवळ हरियाणा आणि पंजाबमधील आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा कबड्डी सामना होणार आहे. या सामन्यात मुलींचा संघ आणि मुलांचा संघही सहभागी होणार आहे. तासभर इथे थांबल्यानंतर राहुल गांधी कर्नालच्या दिशेने रवाना होतील. कर्नाल येथील कर्ण तलावाजवळील लवली नर्सरीजवळ रात्रीचा मुक्काम.

Tags:    

Similar News