राफेल विमानांचे काँग्रेसकडून स्वागत, ५ प्रश्नांची मागितली उत्तरं

Update: 2020-07-29 14:04 GMT

भारताची हवाई ताकद वाढवणाऱ्या राफेल विमानांचं भारतात आगमन झालेले आहे. पाच राफेल विमाने हरयाणाच्या अंबाला हवाई पट्टीवर उतरली आहेत. चीन बरोबर निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राफेल विमान भारताच्या ताफ्यात दाखल झाल्याने भारताची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रान उठवलं होतं.

राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत. फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले आहेत. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF च्या काही जणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात ही विमाने भारतीय लष्करात समाविष्ट करून घेतली जाणार आहेत. त्यासाठी एका मोठ्या सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात येणार आहे

दरम्यान काँग्रेसने या राफेल विमानांचं स्वागत केलेला आहे काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून भारतीय हवाई दलाचे अभिनंदन देखील केला आहे पण त्याचबरोबर सुरजेवाला यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक देशभक्तांना मागितली पाहिजेत असे देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.

Similar News