पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेत २२,००० फेक लोन अकाउंट्स !

Update: 2019-12-28 14:04 GMT

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेत २२,००० फेक लोन अकाउंट्स काढून कर्जे एचडीआयलं कडे वळवली गेली आहेत. आणि हे प्रकरण अनेक वर्षे सुरु होतं. मागे सत्यम कॉम्युटर्सच्या राजुने १०,००० फेक सॅलरी अकाउंट काढून पैसे खेचून घेतले; हे देखील अनेक वर्षे सुरु होतं. पंजाब नॅशनल बँकेत लेटर ऑफ क्रेडिट मार्फत केला गेलेला घोटाळा असाच आहे.

हे जे काही घोटाळे होतात. ते काही एका रात्रीत चोरांच्या टोळीने अचानक धाड घालणे नाहीये. सिस्टीमचा अभ्यास करून, त्यातील खाचाखोचा समजावून घेऊन, सिस्टीम मॅन्युप्युलेट करून अनेक वर्षे ती मोडस ऑपेरांडी वापरून केले जाते. आणि हे वार्याम सिंग, निरव मोदी, राजू हू मंडळी ऑफिसेस मध्ये रात्रीच्या काळोखात जाऊन स्वतः करत नाहीत. सिस्टीम मध्ये काम करणाऱ्या कारकून, कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राबवून घेतात.

हे ही वाचा...

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेत २२,००० फेक लोन अकाउंट्स !

ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी आहे का?

‘व्यंगनगरी’ मूक झाली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझा मुद्दा वेगळा आहे.

मध्यमवर्गातील व्यक्ती, खाजगी, सार्वजनिक, सहकार क्षेत्रात काम करणारे, किती काळ राजकारणी भ्रष्ट आहेत? क्रोनी कॅपिटॅलिस्ट, नियामक मंडळांची सुपरव्हिजन दुबळी आहे. यामागे हे लपणार आहेत ? यांच्यापैकी कोणालाही जे काही चालू आहे. ते बाहेर पोचवण्याचे धैर्य झाले नाही ? कितीतरी प्रकारे निनावी पद्धतीने व्हिसल ब्लोअर गिरी करता येते. समाजातील मध्यमवर्गात धैर्य राहिलेले नाही कशामुळे ? लहानपणापासून असुरक्षितता ही एकमेव भावना पेरल्यामुळे ?

Similar News