पुण्यात महाविकास आघाडीसह मनसेचा हंडा मोर्चा

Update: 2019-12-25 17:01 GMT

पुणे शहरात गुरुवारी (26 डिसेंबर) पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. या विरोधात महाविकास आघाडीसह मनसेने महानगरपालिका कार्यालयात आज हंडा मोर्चा काढला होता. दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा होणार नसल्याचं महापालिकेने सांगितले आहे. उद्या संपूर्ण दिवसभर पुणे शहरात पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुणे शहरातील पाणी पुरवठा खंडीत करण्यामागे भाजपचं राजकारण असल्याचा आरोप यावेळी मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. “निवडणुकीपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी पाणी चालु ठेवा सांगितलं आणि निवडणुक संपल्यावर पाणीपुरवठा थांबवला” असं त्यांनी महापालिका कार्यालयात म्हटलं आहे. पाहा व्हिडीओ..

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/548808792637842/

 

 

 

Similar News