नारायण राणेंना मोदींच्या इंग्रजीतून शुभेच्छा

Update: 2022-04-10 07:34 GMT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना इंग्रजीतून दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहेत.

नारायण राणे (Narayan rane) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासह विविध मंत्रीपदे भुषवली आहे. तर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच आज नारायण राणे यांचा वाढदिवस असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. (PM Modi Birthday wishesh to Narayan rane in English language)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नारायण राणे जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आत्मनिर्भर भारताच्या (Aatmanirbhar bharat) संकल्पनेला अधिक बळकट करण्यासाठी नारायण राणे (Narayan rane) विशेष प्रयत्न करत असतात. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेते आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उद्योग मंत्री नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नारायण राणे यांनी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवले होते. त्यानंतर त्यांनी राज्यातील विविध खात्याचे मंत्रीपद भुषवले. याबरोबरच स्वाभिमानी पक्षाची स्थापना करत नवा डाव मांडला परंतू त्याला यश आले नाही. त्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यसभेचे खासदार आणि नंतर केंद्रीय मंत्री बनवण्यात आले. अशा प्रकारे विविध पदे भुषवणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना इंग्रजीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:    

Similar News