राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित

Update: 2022-09-18 02:13 GMT

ब्रिटेन ची राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर रविवारी लंडन येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. पहाटेच राष्ट्रपती मुर्मू या लंडन येथे पोहोचल्या आहेत.


ब्रिटेन ची राणी एलिजाबेथ द्वितीय यांचं ७ सप्टेंबरला वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर रविवारी १८ सप्टेंबरला अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राणी एलिजाबेथ द्वितीय या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धांच्या जन्मदात्या होत्या. त्यामुळेच राष्ट्रकुल संघाच्या सदस्य राष्ट्रांचे प्रमुख आज राजे चार्ल्स तृतीय यांच्या भेटी घेतल्या. भारताकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या अंत्य संस्कारांना उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी शनिवारी संध्याकाळी त्यांनी लंडन साठी दिल्ली विमानतळावरून प्रस्थान केले. शिवाय रविवारी पहाटे त्या लंडन येथे पोहोचल्या आहेत. राष्ट्रप्रमुख असण्याबरोबरच संपुर्ण भारत सरकारचं प्रतिनिधीत्व आज राष्ट्रपती लंडन येथे करणार आहेत.



 


Tags:    

Similar News