केंद्रशासीत प्रदेशात विजेचं खाजगीकरण होणार: अर्थमंत्री निर्मला सितारमण

Update: 2020-05-16 12:27 GMT

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज च्या संदर्भात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था आणि कृषी क्षेत्रासाठी आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत.

आज याच पॅकेजच्या चौथ्या टप्प्यामध्ये पायाभूत सुविधांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण आठ मोठ्या क्षेत्रांसाठी घोषणा करत आहेत. या पॅकेज अंतर्गत देशातील केंद्रशासीत प्रदेशातील विजेच्या खाजगीकरण करण्याची घोषणा केली आहे.

केंद्रशासित प्रदेशात वीज वितरणाचे खाजगीकरण केले जाणार आहे. वीज वितरण कंपन्यांना जादा अधिकार दिले जातील. या संदर्भात वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी बोलताना सरकारच्या या निर्णयामुळं केंद्रशासीत प्रदेशातील सर्व ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्या जातील. तसंच या निर्मयामुळं कंपन्यांचा देखील फायदा होईल.

‘हे’ आहेत भारतातील केंद्रशासीत प्रदेश…

अंदमान आणि निकोबार बेट,

दिल्ली

पाँडिचेरी

दमण आणि दीव

दादरा आणि नागर हवेली

लक्षद्वीप

चंदीगड

जम्मू कश्मीर

लडाख

Similar News