मेडिकलच्या पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Update: 2020-06-09 13:42 GMT

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना डॉक्टरांवरील कामाचा ताण आता वाढतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोस्ट ग्रज्युएट एम डी, एम एस, डिप्लोमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात डॉक्टर्सच्या शिष्टमंडळाने मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली आहे.

कोरोनावरील रुग्णांच्या सेवेत अनेक डॉक्टर अहोरात्र व्यस्त आहेत. अशात ते परीक्षा देण्याच्या तयारीत नसून १५ जुलैला होणारी परीक्षा पुढे घेण्यात यावी याबाबत के ई एम रूग्णालयांच्या डॉक्टर्सच्या शिष्टमंडळाने अमित ठाकरेंना १५०० सह्यांचे पत्रक देऊन ही मागणी केली आहे.

Similar News