दिल्ली प्रदुषणाला पाकिस्तान जबाबदार, योगी सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

Update: 2021-12-03 10:39 GMT

सध्या राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाचा मुद्द्यावरून सरकार चांगलंच अडचणीत आले आहे. यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनवाई पार पडली. यावेळी उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने दिल्ली प्रदूषणामध्ये उत्तर प्रदेशचा कोणताही हात नसल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सी व्ही रमण्णा यांनी आपण पाकिस्तान मधील उद्योग बंद करू इच्छितात का? असा सवाल योगी सरकारला केला आहे. एनसीआर मधील हवा प्रदूषणावरील याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान योगी सरकारच्यावतीने अॅड. रंजीत कुमार यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी दिल्लीमधील प्रदुषणाला आम्ही नाही तर पाकिस्तान जबाबदार असल्याचा दावा केला आहे.

उत्तर प्रदेश मधील प्रदूषित हवा ही दिल्लीच्या दिशेने जात नसल्याचेही यावेळी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. पाकिस्तानच्या बाजूने येणारी हवा दिल्लीवरील हवेवर परिणाम करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

यावर सरन्यायाधीशांनी, आम्ही दिल्लीतील उद्योगांवर बंदी आणावी का ? असा सवाल योगी सरकारला केला. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमधील शाळा प्रदूषणामुळे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारने शाळा पुन्हा सुरू केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली आहे.

Tags:    

Similar News