कोरोना निर्बंध मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी- महापौर ढोरे

Update: 2021-09-04 05:01 GMT

कोरोना निर्बंध शिथील होताच पिंपरी चिंचवड शहरात लग्नसराई व इतर कार्यक्रमात नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर देखील वाहतुक कोंडी होताना दिसून येत आहे.त्यामुळे पोलिस प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पिंपरी चिंचवड मनपाच्या महापौर उषा ढोरे यांनी म्हटलर आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे त्यांनी लक्ष वेधले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली कोरोनाचे अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत त्यांनी पालकमंत्री पवार यांच्याकडे विनंती केली.

या बैठकीस पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे यांनी मजूर अड्डा तसेच झोपडपट्टी परिसरामध्ये फेरीवाले जातात ब-याच वेळा ते मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येते असं म्हटलं आहे. महानगरपालिका संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करत असून पोलिस प्रशासनामार्फत देखील यासंबंधी कारवाई होण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनी देखील स्वत:च्या जीविताचा विचार करुन कोरोना प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे तसेच गर्दीमध्ये जाणे टाळावे असे आवाहन महापौर ढोरे यांनी शहरवासीयांना केले.

Tags:    

Similar News