जामीया मिलीया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनावर पोलिसांचा लाठिचार्च

Update: 2019-12-16 07:03 GMT

नागरिकत्व विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. त्यामुळे या विधेयका विरोधात देशभरात आंदोलनं चालू आहेत. दिल्लीत दक्षिण दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामिया विद्यापिठाच्या परिसरात आज, कॅब विरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यापीठाच्या आवारात गाड्यांची जाळपोळ आणि दगडफेककीच्या घटना घडल्या आहेत.

दिल्लीत तीन बसेस पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठातल्या आवारात घुसून प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली. त्यानंतर हा भडका जास्तच पेटला. जामीयाच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी JNU ची मुलंही रस्त्यावर उतरली त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयाला घेराव घालत तीव्र निदर्शने केलीत. खबरदारीचा उपया म्हणून जामीया मिलीया विद्यापीठाला 5 जानेवारीपर्यंत सुट्टी देण्यात आलीय. तर दिल्ली मेट्रो प्रशासनाने 12 मेट्रो स्टेशन्स बंद केली आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले आहेत.

Full View

Similar News