संतापजनक! अवैध धंद्यांनी घेतला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी

Update: 2020-04-29 04:27 GMT

लॉकडाऊन ची स्थितीतही बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंदे सुरु आहेत. याच अवैध धंद्यांनी पोलिसाची जीव घेतला आहे. राज्यात लॉकडाऊन च्या काळात पोलिसांवर हल्ले वाढले आहेत. पूर्णा नदी च्या किनाऱ्यावरील गावांमध्ये अवैध रेती वाहतूक करणारे वाहन रात्रभर रेतीची वाहतूक करत आहेत.

यामध्ये बुधवारी पहाटे शेगाव तालुक्यातील माटरगाव, भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावरुन एक विना नंबर चे डंप्पर रेती घेऊन खामगाव शहराकडे जात असल्याची माहिती जलंब पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश शिरसाट यांना मिळाली. त्यांनी एका होमगार्डला सोबत घेऊन मोटरसायकलने भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाळूच्या गाडीचा चा पाठलाग केला.

सदर गाडी माटरगाव या गावाच्या पुढे पोहोचली असताना पोलिसाने मोटर सायकल डंपर पुढे आडवी करून वाहन थांबवले. दरम्यान डंपर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून पुढे नेले. घटना घडताच सोबत आलेला होमगार्ड घटनास्थळावरून पळून गेला.

मात्र, पोलीस ठार झाला की नाही ही खात्री करण्यासाठी टिप्पर चालकाने आपले वाहन रिव्हर्स घेऊन रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेल्या त्या पोलिसाला पुन्हा चिरडले. त्यानंतर त्याने हा वाळूच्या गाडीसह खामगाव कडे पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले असून सकाळपासून सदर वाहनाचा शोध सुरु आहे.

Similar News