PMC Bank Scam: बापाची आर्त हाक, 'मी कधी ही मरु शकतो, माझ्या मुलीचे पैसे दया'

Update: 2019-12-11 13:38 GMT

आर्थिक अडचणीत आलेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यानं अनेक लोकांचे कुटूंब अडचणीत आले आहेत. रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर निर्बंध लादल्यानं अनेक खातेदारांना पैसे काढणं मुश्कील झालं आहे.

बँकेची बुडित कर्ज लपवल्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटीचा तोटा झाला आहे. यां सदर्भात मुंबई पोलिसांच्या इकॉनमिक ऑफेन्स विंगनं (EOW) पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेने खातेदारांना पैसे काढण्यास निर्बंध घातल्यानं आत्तापर्य़ंत या धक्क्यात १३ लोकांचा बळी गेला आहे.

त्यापैकी प्रमिला उदय खुंटीया यांची आम्ही त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रमिला यांचा भाऊ बारा दिवसापुर्वी या जगातून गेला. खुंटीया कुटूंब मुंबईतील भांङुप येथे राहते. छताकङे ङोळे लावून झोपलेले प्रमिला यांचे वङील दिसले. वयोमानानूसार कुठे चालता फिरता येत नाही, आजारी असतात.

आपल्या घरी माध्यमांचे प्रतिनिधी आले असं समजताच, प्रमिला रडू लागल्या भावाच्या आठवणीत त्या फोटो दाखवू लागल्या. कसं तरी त्यांना सावरलं, त्यांनी त्यांची करुण कहाणी सांगायला सुरुवात केली.

प्रमिला म्हणत होत्या

"१०वर्षापुर्वी नवरा वारला, आता भाऊ आणि आम्ही सर्व इथं राहत होतो. आता भाऊ गेला आमचा संपूर्ण आधार गेला, वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आमच्याकङे जे पैसे होते ते पीएमसी बँकेत आहेत. माझा भाऊ पीएमसी बँकेचा खातेदार होता. घरची परिस्थिती हालाखीची आहे. भावाला माझी नेहमी काळजी होती, बँकेत अडकलेले पैसे मिळतील. की नाही? या तणावाने त्यांना हदयविकाराचा झटका आला. त्याचा मृत्यू झाला. माझा आधार तुटला. मी पुढे कसं जगणार? वङीलांना औषधांसाठी पैसे लागतात, बँकेचा नियम आहे. खातेधारकालाच फक्त १लाख रक्कम काढता येते. वङीलांना अचानक काही जास्त कमी झालं तर मी काय करु?

मुलांच्या फी आहेत. त्या भरल्या नाही. खूप आंदोलन केली. मोर्चे झाले. अनेक खातेदार गेले. माझ्यावर दया करा आमचे पैसै आम्हांला परत दया. असं म्हणत घरातील परिस्थिती विषद केली.

वङील म्हणाले 'मी कधी ही मरु शकतो, माझ्या मुलीचे पैसे दया' झोपलेल्या वडीलांना आमच्याकडं कटाक्ष टाकत हे शब्द म्हटले.आता एका बापाची आर्त बापाची हाक या सरकारला जाग करते की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणात ज्या खातेदारांचे पैसे आहेत ते दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. मात्र, बॅंकेवरील निर्बंध कधी हटवले जाणार याकडे डोळे लावून बसले आहेत.

Full View

Similar News