मजूरांचा पायी प्रवास, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी व्यक्त केल्या संवेदना

Update: 2020-05-14 14:44 GMT

निर्मला सीतारमन यांना मजूरांच्या परिस्थितीमुळे दुःख झालं आहे. माझ्या ह्रदयाला मजूरांच्या चालत जाण्याच्या दृश्यांनी टोचणी लागलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या दृश्यांमुळे व्यथित असून त्यांनी ही सुरूवातीलाच मजूरांना आहे तिथेच थांबा असं त्यांनी विनवलं होतं मात्र मजूरांनी स्थलांतराला सुरूवात केली, असं मत व्यक्त करून निर्मला सीतारमन यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

स्थलांतर करत असलेल्या मजूरांच्या परिस्थितीवर देशभर हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. वेळेवर रेल्वे न सोडल्याने अनेक श्रमिकांनी पायीच आपल्या राज्यात परत जाण्याचा निर्णय घेतला होता. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधले कोट्यवधी मजूर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू अशा औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यांमध्ये आहेत.

यांच्या परतण्याच्या सुविधेसाठी त्या राज्यांनी पुरेशी व्यवस्था न केल्यामुळे श्रमिकांनी पायीच परत जाण्याचा निर्णय घेतला. जगभरातून या स्थलांतराबाबत टीका झाल्यानंतर आता केंद्र सरकारने आज कोव्हिड-१९ पॅकेजच्या दुसऱ्या भागात या श्रमिकांसाठी काही तरतूदींची घोषणा केलीय. पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्याचं ही पहिल्यांदाच सरकारतर्फे अधिकृतरित्या सांगीतलं आहे.

Similar News