पंतप्रधान मोदी थेट लेहमध्ये, चीनला थेट इशारा

Update: 2020-07-03 05:28 GMT

भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्याच्या निमित्ताने निर्माण झालेला तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लेहमध्ये जाऊन सैनिकांची भेट घेतलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख लेहमध्ये जाऊन सैन्याची तयारी पाहणार होते, अशी चर्चा होती.

पण अचानक लष्करप्रमुखांसोबत संरक्षण मंत्र्यांनऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत.

पंतप्रधानांनी याठिकाणी गलवान खोर्‍यातील संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची विचारपूस देखील केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणचे सैन्याधिकारी आणि सैनिकांची देखिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलेला आहे

Similar News