लॉकडाऊनचा पाचवा टप्पा आज संपणार, पंतप्रधान देशाशी संवाद साधणार

Update: 2020-06-30 01:00 GMT

केंद्र सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासंदर्भातले आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

चीन बरोबर निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यामुळे मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर 31जुलैपर्यंत देशातील सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. रात्रीच्या वेळी लागू करण्यात आलेला कर्फ्यू कमी करुन आता रात्री 10 ते सकाळी 5 असा असणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासही वंदे भारत उपक्रमांतर्गत मर्यादित स्वरुपात सुरू राहणार आहे. त्याचबरोबर मेट्रो रेल्वे, बार, जिम, स्विमिंग पूल, सिनेमा हॉल, मॉल्स, थिएटर्स यावरील बंदी कायम राहणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये 31 जुलैपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान परिस्थितीचा अंदाज घेऊन कोणत्या गोष्टींना परवानगी द्यायचा निर्णय घेतला जाणार असल्याचेंही स्पष्ट करण्यात आले आहे.

Similar News