२१ परमवीर चक्र विजेत्यांची नावे अंदमानातील बेटांना...

Update: 2023-01-24 09:27 GMT

अंदमानमधील विविध बेटं यापुढे परमवीरचक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे हे नामकरण करण्यात आले.भारतीय लष्कराची सेवा करताना असाधारण शौर्य गाजविणाऱ्या २१ परमवीर चक्र विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सन्मान केला आहे. अंदमान निकोबार येथील २१ निनावी बेटांना सोमवारी या पुरस्कारविजेत्यांची नावे देण्यात आली. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे नामकरण्यात आले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामकरण केले. मोदी यांनी यावेळी नेताजींना आदरांजली वाहिली. ब्रिटिश वसाहतवादाविरोधाचा कडवा प्रतिकार करणारे योद्धे म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्या स्मरणात राहतील, असे मोदी यावेळी म्हणाले. मोदी सरकारतर्फे २०२१ पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाते. पंतप्रधानांनी दूरस्थ प्रणालीद्वारे नेताजींच्या प्रस्तावित स्मारकाच्या प्रारुपाचे यावेळी अनावर केले. अंदमान निकोबार येथे हे स्मारक उभारण्यात येणार आहे. सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान या ठिकाणी १९४३ मध्ये सर्वप्रथम आपल्या देशाचा ध्वज फडकवला होता. नेतांजीवरील या स्मारकात वस्तूसंग्रहालय, केबल कार रोप-वे, लेसर साऊंड शो, वास्तूवारसा सफारी आदींचा समावेश असणार आहे. 

Tags:    

Similar News