भारत -चीन संघर्ष- आज सर्वपक्षीय बैठक

Update: 2020-06-19 03:16 GMT

लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांच्या प्रमुखांना बोलावण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिजू जनता दलाचे खासदार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतर पक्षांचे प्रमुख उपस्थित राहतील असे समजते आहे.

हे ही वाचा..

चीनने मृत सैनिकांचा आकडा का लपवला?

भारत चीन वाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

भारत – चीन संघर्षावर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रीय जनता दलाला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही अशीही चर्चा आहे. या बैठकी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी आणि चीनबाबत पुढची रणनीती काय असेल याबाबत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Similar News