सांगलीत ‘चिपको आंदोलन’

Update: 2020-07-16 11:31 GMT

रस्त्यांच्या कामासाठी अनेक वृक्ष तोडली जात असताना पर्यावरण प्रेमी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करतात. पण सांगली जिल्ह्यातील भोसे इथं ४०० वर्ष जुना वटवृक्ष राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तोडला जाणार असल्याने निसर्गप्रेमींनी चिपको आंदोलन केले आहे.

भोसे इथं असणारा हा वटवृक्ष चारशे वर्षाचा असून तो या भागाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे, असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे. या आंदोलनात आता वारकरीदेखील सहभागी होणार आहेत. या रस्त्याच्या कामात तानंगफाटा ते पंढरपूर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही असे लोकांचा म्हणणे आङे. पण हे झाड सुमारे ४०० वर्षांपासून लोकांना सावली देत आहे. त्यामुळे ते तोडू नये असे लोकांचे म्हणणे आहे. या आंदोलनानंतरही झाड तोडण्याचा निर्णय मागे घेतला गेला नाही तर कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एडव्होकेट असीम सरोदे या खटल्याचे काम पाहणार आहेत. यासाठी नागरिकांकडून सह्याची मोहीम राबवली जात आहे.

Similar News