ईएसआयमध्ये अस्थिरोग तज्ज्ञाअभावी रुग्णांचे हाल

Update: 2019-12-11 11:45 GMT

मोहननगर येथील राज्य कामगार विमा रूग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञाचे पद रिक्त आहे. दिवसाकाठी सुमारे 100 रुग्ण अस्थिरोगाच्या उपचारासाठी येत आहे. सुमारे आठ रुग्णांवर उपचार केले जातात. अतिगंभीर आजार असल्यास टायप केलेल्या इतर रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जात आहे. त्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये औद्योगिकरणामुळे कामगारांची संख्या वाढत आहे. राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 5 लाख कामगार याचा लाभ घेत आहेत. तसंच विमा कायद्याअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा लाभ घेण्याची सुविधा आहे. ही संख्या अधिक असताना रूग्णालयातील कर्मचार्‍यांची संख्या फारच कमी आहे. अनेक वेळेला उपचार करण्यासाठी बाहेरून तज्ज्ञ बोलाविण्याचीही वेळ रूग्णालयावर येत आहे. कर्मचार्‍यांची ही संख्या भरून कामगारांना योग्य उपचार तरी कधी मिळणार हा प्रश्न आहे.

हे ही वाचा

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

गांधीजी आम्हाला माफ करा – हेमंत देसाई

अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी

कंपनीत काम करताना किंवा इतर ठिकाणी कामगारांना अनेक अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर उपचारासाठी रुग्ण मोहननगर येथील कामगार रुग्णालयात येत आहेत. या ठिकाणी प्राथमिक तपासणी केली जात आहे. औषधोपचार दिले जात आहे. मात्र अस्थिरोग तज्ज्ञ नसल्याने त्यांना पुढील टायप केलेल्या रुग्णालयात पाठविले जात आहे. दिवसाकाठी शंभर रुग्ण अस्थिरोग विभागात उपचार घेण्यासाठी येत आहे. या पैकी 8 रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जात आहे.

अनेकांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) मध्ये पाठविले जात आहे. अस्थिरोग विभागासाठी 20 खाटा आरक्षित आहेत. मात्र, अस्थिरोग तज्ज्ञाअभावी हा विभाग असून अडचण अन नसून खोळंबा होत आहे.

रुग्णांना सलाईनच्या बाटल्या लावण्यात येतात. त्यानंतर रिकाम्या झालेल्या या बाटल्यांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. मात्र, त्याची विल्हेवाट लावण्यात रुग्णालयाला अपयश येत आहे. रुग्णालयाच्या एका कोपर्‍यात कर्मचार्‍यांकडून बाटल्या तशाच ठेवल्या जात आहेत.

रुग्णाचे नातेवाईक रामकृष्ण मंगे सांगतात...

कंपनीत काम करत असताना माझ्या मुलाच्या गुडघ्याला इजा झाली आहे. त्यामुळे उपचारासाठी पिरंगुटवरून आलो आहे. या ठिकाणी कागदपत्रांची जमवाजमव करतानाच तासभर लागला. त्यानंतर गोळ्या दिल्या. उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात जाण्याची सुचना केली आहे. फुकट उपचार मिळत आहे. मात्र इतर गोष्टींचाच अधिक त्रास आहे.

मोहननगर येथील राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनीषा पाटील यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी

सध्या रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ नसल्याचं मान्य केलं. दिवसाकाठी 100 जणांची ओपीडी होत आहे. अस्थिरोग विभागात आलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करत आहे. अतिगंभीर इजा असल्यास इतर रुग्णालयात उपचारासाठी पाठवत असल्याचं सांगितलं आहे.

Similar News